Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
प्राचीन-अर्वाचिनाच्या सुंदर मिलाफाचा नवा अध्याय

डॉ. नीलेश गुल्हाणे यांनी अमरावतीच्या विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयातून बीएएमएसची पदवी मिळवली. गेल्या सतरा वर्षांपासून पुलगाव (जि. वर्धा) येथे पार्वती क्लिनीकच्या माध्यमातून आयुर्वेद आणि जनरल प्रॅक्टिस करीत आहेत. केस या मानवी सौंदर्यातील अविभाज्य अंग असलेल्या घटकाबद्दल आयुर्वेद आणि अर्वाचिन शास्त्राचा सुंदर मिलाफ असलेला एक नवा अध्याय वैद्य हरिश पाटणकर सरांच्या संकल्पनेतून उदयाला आला. साधारणतः दोन वर्षांपूर्वी वैद्य हरिश पाटणकर सरांच्या केस व सौंदर्यविषयक क्लासेसबाबत डॉ. नीलेश यांना माहिती मिळाली. त्यात अंतर्भूत असणार्या विषयांनी प्रेरित होवून डॉ. नीलेश यांनी सदर कोर्सला प्रवेश घेतला. या कोर्सच्या पहिल्याच दिवशी आपल्याला जे काही हवे आहे (ज्याच्या शोधात ते अनेक वर्षापासून होते) ते सर्व इथे नक्की मिळेल, अशी खात्रीच डॉ. नीलेश यांना झाली. पाटणकर सरांचे आयुर्वेदाबाबतचे अगाध ज्ञान पाहून आजच्या काळात एक खूप चांगला व प्रामाणिक गुरु मिळाल्याचा मनस्वी आनंदही डॉ. नीलेश यांना झाला. पाटणकर सरांनी प्रत्येक विषय ज्या सहजसोप्या पद्धतीने समजावून सांगितला. त्यामुळे आयुर्वेदाच्या अंतरंगात शिरता आले व आधी क्लिष्ट वाटणारे अनेक विषय अत्यंत सोपे होऊन डोक्यात फिट्ट बसले. या कोर्समधून केवळ रुग्णांच्या केसांबद्दलचाच नाही, तर माझ्याकडे येणार्या प्रत्येक रुग्णाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टीकोन मिळाला.

पाटणकर सरांकडून केसांबाबत मिळालेले ज्ञान अतुलनीय आहे. या सगळ्यातून अत्यंत भारावून गेल्यामुळे मी लगेचच केशायुर्वेदची शाखा पुलगांव येथे सुरु करण्याचा निर्णय घेतला व त्यामुळे एक वेगळी ओळख निर्माण झाल्याचे डॉ. नीलेश सांगतात. या गावात आणि परिसरात कुणालाही केसांसंबंधी त्रास असल्यास माझे नाव त्या रुग्णास सुचविण्यात येते. असा रेफरन्समध्ये आलेला रुग्ण जेव्हा याबाबत सांगतो तेव्हा पाटणकर सरांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते, असे ते म्हणतात. आपल्याला एक विशिष्ट ओळख मिळवून दिल्याबद्दल डॉ. नीलेश सरांचे मनोमन आभारही व्यक्त करतात.
वास्तविक पुलगावसारख्या छोट्याशा गावात डॉक्टरचे अस्तित्व ते काय? छोटा-मोठा आजार झाला, तरी रुग्ण वर्धा शहराच्या दिशेने धाव घेतात. तिथेही फार मोठे तज्ज्ञ आहेत, अशी परिस्थिती नाही. परंतु शहरातला डॉक्टर शिकलेला असतो, चांगला असतो, अशी गावातल्या लोकांची धारणा असते. परंतु असे असूनही केशायुर्वेदमुळे केवळ केसाच्याच नव्हे तर सर्व प्रकारच्या रुग्णांच्या मनात त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण केली आहे, असे डॉ. नीलेश सांगतात. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात असे नाते निर्माण करणे ही सर्वस्वी अत्यंत कठीण गोष्ट आहे. या विश्वासाचा पाया केशायुर्वेदच्या शृंखलेतील उत्तम निदान, उपचार आणि फॉलोअपची पद्धत यावर आधारीत आहे, हे डॉ. नीलेश विशेष मानतात.
केस हा आपल्या शरीरावरील एक छोटासा घटक आहे. पण त्याची व्याप्ती किती मोठी आहे, ह्याची कल्पना केशायुर्वेदमध्ये आल्यानंतरच आली. 108 केशायुर्वेद रत्नांची टीम केसांबाबत सतत संशोधन करीत आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रांतातील वैद्य मंडळी आहे. त्यामुळे स्थळ-काळ-वयानुसार केसांमध्ये होणारे बदल व त्यावर केल्या जाणार्या उपचारांची जंत्रीच केशायुर्वेदकडे जमा आहे. सर्व काम हे सिस्टिम बेस्ड असल्यामुळे केसांचे विविध आजार, त्यात केली जाणारी चिकित्सा व मिळालेले रिझल्ट या सगळ्याचा साठा डिजिटल स्वरूपात केशायुर्वेदकडे आहे. त्यामुळे केसांचा कोणताही रुग्ण आल्यास मला हे जमेल की नाही, हा विचारच मनात येत नाही. प्रत्येक रुग्णावर उपचार करण्याचा एक विश्वास डॉक्टरांच्या मनात निर्माण झाला आहे, हे केशायुर्वेद परिवाराचे वैशिष्ट्य आहे, असे डॉ. नीलेश सांगतात.
केशायुर्वेदमध्ये प्राचीन आयुर्वेदाच्या तत्त्वांचा विचार करून जसे केसांवर उपचार केले जातात, तसेच अर्वाचीन तंत्राचा उपयोग करूनही केसरोगांचे निदान व उपचार केले जातात. केशायुर्वेदमध्ये सतत संशोधन सुरुच असते. सर्वच शाखांकडून आलेल्या सूचना अत्यंत काळजीपूर्वक जपल्या जातात. त्यामुळे सर्वच टीमच्या ज्ञानात सतत नवीन माहितीची भर पडत असते. केशायुर्वेदाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून त्यांना असणार्या समस्यांचे निराकरण करण्याचा आम्ही केशायुर्वेद टीममधील मंडळी सतत प्रयत्न करीत असतो. एखादा रुग्ण अनेक उपचार करुन थकल्यानंतर आमच्याकडे येतो व त्याला जेव्हा यश मिळते, तेव्हा त्याचा आनंद बघून मनाला नक्कीच समाधान मिळते आणि उत्साह द्विगुणीत होतो.
    केशायुर्वेद या संकल्पनेची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यातले महत्त्वाचे म्हणजे या सर्व फ्रँचायजी धारकांचा एक ग्रुप आहे. या सोशल मीडियाच्या ग्रुपवर आपापसांत मुक्तसंवाद सुरू असतो. केशायुर्वेदच्या संदर्भात कोणत्याही गोष्टीचे मार्गदर्शन येथे होत असते. मग ते रुग्णाच्या आजाराच्या निदानाविषयी असो, त्याच्यावर करायच्या उपचारासंदर्भातील असो की त्याच्याही पलीकडच्या एखाद्या समस्येशी संबंधित असो, या सगळ्या विषयांवर इथे मुक्त संवाद सुरू असतो. पाटणकर सर नियमितपणे या सर्वांना आयुर्वेद शास्त्रातील अद्ययावत माहिती देत असतात. त्यामुळे आम्हा सर्व डॉक्टरांच्या मनात कायम आत्मविश्वासाची भावना असते.
    सामान्यपणे कोणताही डॉक्टर एकटा किंवा एक-दोन सीनियर्सच्या पाठिंब्यावर त्याची प्रॅक्टिस करत असतो. परंतु केशायुर्वेदमध्ये आम्ही एक-दोन नव्हे, तर तब्बल 108 सहकार्यांच्या साथीने प्रॅक्टिस करत असतो. त्यामुळे एखादी केस हँडल करत असताना ती मी एकटा नव्हे, तर हे सगळे 108 सहकारी हँडल करताहेत अशी एक संघीय भावना आमच्या मनात असते, असे डॉ. नीलेश सांगतात. केशायुर्वेदमधील दोन वर्षांच्या प्रवासानंतर पुढील काळात मी केसांचा स्पेशालिस्ट म्हणून नक्कीच ओळखला जाईल, याची खात्री असल्याचेही डॉ. नीलेश सांगतात. आजचा मानव अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. ह्या धकाधकीच्या जीवनात त्याला रोज नव्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातूनच त्याच्या आरोग्यावर व जीवनशैलीवर खूप आघात होत आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आता आयुर्वेद व योगाकडे वळलेच पाहिजे. तात्पुरत्या उपचारापेक्षा आपल्या आरोग्य समस्यांचे निराकरण करणार्या आयुर्वेदाचा अंगीकार प्रत्येकाने करावा हीच अपेक्षा डॉ. नीलेश यांना आहे. केशायुर्वेदच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना सामान्य विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार दिल्याबद्दल डॉ. नीलेश, पाटणकर सरांनाही धन्यवाद देतात.

Organization Details

नाव : डॉ. निलेश रमेश गुल्हाणे
शिक्षण : बीएएमएस
क्लिनिकचे नाव : पार्वती क्लिनीक
पत्ता : पुलगाव, जि. वर्धा
मोबाईल : 99890724704
ईमेल : [email protected]
कधीपासून प्रॅक्टिसमध्ये : 2001 पासून
केशायुर्वेदशी संलग्नित : जुलै 2017

Our Specialities

  • One stop solution for all your hair and skin problem.
  • Accurate diagnosis and perfect treatment.
  • Complete Scalp Analysis, Photography, Microscopic Testing as well as HQ (Hair Quotient) and HP (Hair Prakruti) analysis.
  • Authentic Ayurvedic treatment from team of expert doctors like Ayurvedacharya’s, Cosmetologist’s, Trichologist’s.
  • Wide range of hair and skin care herbal products.